साल 2019
साल 2019
मागे वळून जरा पाहिले
सारे कसे स्पष्ट स्पष्ट
काहीच न विसरण्या सारखे
सारे प्लस प्लस उणे काहीच नाही
नाही म्हटलं तरी एक आजार पण येऊन गेलं
पण ते जाता जाता बरंच काही सांगून गेलं
सारेच करतात आपली काळजी याची
जाणीव मला करून गेलं
साल 2019
माझी आनंदाची ओंजळ सतत भरत राहिलं
सारेच माझे माझेच बनून राहिले आहेत
आता मात्र हिच भावना निर्माण झाली आहे
जीवनाचा हा चढता आलेख असाच
चढत पुढे पुढे जात राहो
माझ्यासारखे सर्वांचे आयुष्य आनंदी राहो
ही सदिच्छा
2019 साल तुला आता निरोप देण्याची
वेळ आली आहे तू सुख रूप मार्गस्थ हो
म्हणजे मी 2020 नववर्षाचं स्वागत करून
नवा संकल्प करण्याचं व तो पुरा करण्याचा
प्रयत्न करेन
