STORYMIRROR

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

सागरी किनारा प्रसंग काव्य

सागरी किनारा प्रसंग काव्य

1 min
223

रम्य अशा त्या सायंकाळी

स्पर्शून अंगाला थंड वारा

फेसाळलेल्या समुद्र लाटा

भेटे प्रेमिका सागरी किनारा ||१||


सांज ती होती पुनवेची

भरती ही समुद्रा आली

गुजगोष्टीच्या नादात

लाटांना विसरून गेली ||२||


हातात हात घालूनी

सुंदर एकांतात रमली

फेसांलेल्या लाटांनी

वाळू पायी सरकली ||३||


आला कानावर साद 

छोट्या मुलीचे इशारे

आशा चांदनी राती

पाहून अंगावर शहारे ||४||


दया करून मुलीवर

केली पैशाची मदत

घरी देऊन ,पोटभर खा

समारोप अशा भाषेत ||५|| 


Rate this content
Log in