STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

सागर

सागर

1 min
226

सागर किनारा

मना मोहवितो

प्रेमी युगुलांना

सदा खुणावतो।।१।।


शंख नि शिंपले

माणिक नि मोती

सागर तळाशी

रत्ने मिळे किती।।२।।

 

रूपाने सागर

अथांग विशाल

विश्वाचा कचरा

गिळतो खुशाल।।३।।


कचरा गिळून

पोटी साठवतो

अवघ्या जगाला

मीठ खारे देतो।।४।।


माणसाचे मन

असेच असावे

त्याला पाहू जाता

तसेच बनावे।।५।।


येईल तयाशी

आलिंगन द्यावे

गुण अवगुण

पोटी साठवावे।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन