सागर शब्दांचा
सागर शब्दांचा
1 min
187
अथांग सागर शब्दांचा
कुणा कळे गर्भाभोवती
शिंपला करी साठवण
विखुरलेले शब्दमोती.....
अबोल असीम लाटांच्या
मिलना अर्थ शुभंकर
निःशब्द सरिता भावना
भाव प्रीतिचा रत्नाकर.....
आले उधाण सागराला
जलवलय बेफाम हा
स्थितप्रज्ञ असा किनारा
भावविहंग बेधुंद हा.....
अनभिज्ञ शब्दखजिना
निर्झर निखळ काव्यांचा
सादर निसर्ग देवता
अथांग सागर शब्दांचा.....
अधर हलता धरेचे
ओठी लाविले पानामृत
मंथन होता सागराचे
स्वेच्छाचारिणी शब्दामृत.....
