साधेपणा तुझ्यातला....
साधेपणा तुझ्यातला....
तुझ्यातील साधेपणा मनास भावतो
तुझा स्पर्शगंध ह्रदयास भिडतो....
तुझे बोल जरी अबोल असतात
नुसत्या तुझ्या नजरेनेच
सारे काही बोलून जातात....
तुझ्या साधेपणानेच अंतरीचा ठाव घेतेस तू
एखाद्याच्या ह्रदयात स्वतःच नाव कोरतेस तू....
कामावर तुझी असते आत्मिक निष्ठा
इतरांच्या भल्यासाठीच असते तुझी अधीरता...
चैतन्याचा झरा तू पसरवतेस
दुखितांचे दुःख ही तू
निवारण करतेस....
तुझी सोबत मला लाभली
सार्थक वाटे या जन्माचे
देवाच्या या चमत्काराचे
फेडू कसे ऋण लाभलेल्या क्षणांचे...
लाभलेल्या या क्षणांचा
सोहळा मला जगू देत
तुझ्या साधेपणातल्या तू वर अतोनात प्रेम मला करु देत...
