साद घालते मी तुझं पांडुरंगा.....
साद घालते मी तुझं पांडुरंगा.....
ठेवुनिया कर कटावरी
शोभे तुळशीहार गळा
सांभाळी विश्वाचा तू पसारा
मज लागला रे विठु तुझा लळा
मिटूनिया डोळे उभा तू विटेवरी
युगे-युगे गुण गाती वारकरी
लेकरांस तारी पंढरीचा हरी
साऱ्या जगताचा तू कैवारी
गोरगरिबांनचा तू देव
नाही दारी तुझ्या भेदभाव
धाव-धाव रे श्रीहरी
तारावया लेकरांस भूवरी
टेकवीता माथा चरणी तुझीया
मिळे समाधान चित्ती माझिया
भेटीची आस लागली रे मना
सांग कधी संपेल हा करोना
एक तुझी रे आशा
नाहीतर सारीच निराशा
माणूस तूच घडवला
आता तोही बि-घडला
कुठं मागू मी उत्तर
सारे झाले खूप तर
आता तूच काहीतरी कर
हलवून हात दाव तुझा चमत्कार
साद घालते मी तुझ पांडुरंगा
विनविते तुला माय-बापा
आवर रे माणसा ह्या कलयुगा
आता तुझाच सहारा प्रत्येक विकोपा
