रयतेचे राजे
रयतेचे राजे
1 min
142
माँ जिजाऊंनी संस्कार हो दिले
माऊलीने त्या शिवबांना घडवले॥धृ॥
आई भवानीला वंदन करोनी
चरणी हो माथा टेकवुनी
रायरेश्वरी शपथ घेऊनी
स्वराज्य हे स्थापिले॥१॥
जिगरबाज मावळे
साथीला होते
भगवा खांद्यावर घेऊनी
स्वराज्य हे वाढविले॥२॥
छत्रपती शिबवा राजे
सार्या रयतेचे राजे झाले
अल्प आयुष्य मिळुनी ही
कर्तृत्व हो मोठे झाले ॥३॥
हर हर महादेव गजर करोनी
शत्रुशी ते भिडले
वार्यासारखे येऊनी
गनिमी कावे केले॥४॥
