STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

रयतेचा राजा छत्रपती शिवराय

रयतेचा राजा छत्रपती शिवराय

1 min
450

शिवनेरी गडावरी प्रभा फाकली!

देवी शिवाईची खरी कृपा झाली!

जन्मला शिवबा रयतेचा वाली !!!

शिवछत्रपती शिवराय माझा!!१


अटकेपार झेंडा लावी बेधडक!

हिंदवी स्वराज्य संस्थापक!!

स्त्रियांच्या अब्रुचा खरा रक्षक!!!

शूर,महाप्रतापी शिवाजी राजा!!२


कावेबाज शत्रूशी भिडावा!

रणनीती केली गनिमी कावा!!

त्याचा पराक्रम सदा आठवावा!!!

गड,किल्ले राखीले बुरुजा!!३


अष्टप्रधानमंडळ नेमली सजा!

प्रजेच्या रक्षणार्थ कामकाजा!!

प्रजाहितदक्ष,इमानी राजा!!!

कल्याणकारी,शिवाजी माझा!!४


जिजाऊचा सुपुत्र थोर!

जमवून मावळ्यांची पोरं!!

लढे मुघलांशी युद्ध घनघोर!!!

पिता लाभला शहाजी राजा!!५


त्यासमान जाणता राजा !!

पुन्हा कधी होणे न दूजा!

शंभाजी शोभे सुपुत्र ज्या!!

मुघलांच्या नमवून फौजा!!६



Rate this content
Log in