STORYMIRROR

Latika Choudhary

Others

2  

Latika Choudhary

Others

रूप तुझे माय

रूप तुझे माय

1 min
2.5K


काय आणीतेस माये डोळीयात पानी

तुझ्यारूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी

जन्मजात बंधनात, बेडी ही पायात

भोग भोगतेस कशी, जसा कर्मलेख

अश्रू जिरविते नयनी, अंतरी दिनवानी

तुझ्यारूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी ।।

रुप तुझे नानापरी, तू निभवी सत्वरी

बळ देई जगण्या बाळा, मृत्यू पत्करूनी

दाखविले मला जग,उदर फाडुनी

तुझ्या रूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी ।।

घरासाठी जाळी रक्त,भाव आटवूनी

स्वप्न सारे कोंडी सुप्त ,दुज्या हासवुनी

कुठे शोधू माये तुजला ,झाले दिनवानी

तुझ्या रूपामध्ये मी गं जन्म सार्थ मानी ।।


Rate this content
Log in