STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

रूप सावळे सुंदर

रूप सावळे सुंदर

1 min
250

रूप सावळे सुंदर

दोन्ही हात कटेवर

पाय समान ठेऊन

स्तब्ध उभे विटेवर


कानी  मकर कुंडल 

माळ तुळशीची गळा

अष्टगंध   भाळावर

लावी वैष्णवांना लळा


शेला शोभे अंगावर

कासोटीला पितांबर

उभा राहून टाकतो

प्रेम दृष्टी भक्तांवर


रखमाई  संगे उभा

वाट पाहे जगजेठी

युगा युगांची प्रतिक्षा

झुरतसे भक्तांसाठी


कटेवर हात,  सांगे

खोली भव सागराची

मागे मागे येई भक्ता

सोड आस संसाराची


रूप  सावळे  सुंदर

डोळा भरूनिया पाहू

पुंडलिका सम कर्म

त्याच्या चरणाशी वाहू


साहित्याला गुण द्या
लॉग इन