STORYMIRROR

Shila Ambhure

Children Stories

3  

Shila Ambhure

Children Stories

रुसलेला बाळ

रुसलेला बाळ

1 min
568


उदास का

माझा बाळ?

हवा का रे

तुला टाळ?


पाहिजे का

लाडू गोड?

पेरुची का

देऊ फोड?


येशील का

फिरायला?

देते कुल्फी

चाखायला.


भांडला का

दादा तुला?

बोल ना रे

माझ्या मुला.


भरू का मी

त्याला रागे?

नको लपू

दारामागे.


करीशी का

असा चाळा?

हसशील 

कधी बाळा?



साहित्याला गुण द्या
लॉग इन