रुद्रमंथन
रुद्रमंथन
1 min
197
अलगद उतरला सोन कवड़सा श्रावण धारा मेघातुन
नाचु लागले मोर केतकी रंग मोहरले रेशमातुन
शिर शीर शिर शिर शिरला वारा रूपेरी त्या पंखातुन
उबदार ही शिळ घालीत राघु फिरला रानातुन
घड घड घड घड झाड़ हलले हलला पक्षी देठातुन
थर थर थर अंग मोहरले उसवले हिरव्या पानातुन
झर झर झर झर रुद्रमंथन ते तलम सोन शलाक्यातुंन
सा रे ग म सरगम उठती
वृंदावनी त्या वेणुतुन
बहरे रंग रंगीत बहार हा सृजनाच्या कर्ण कोशातुन
कोष्यातुन तृप्त झाले नीसटले मोती चोचीतुन
हर हर हर्दिनी अमृत वाणी स्त्रवते पाणी झरयातून
तड़ तड़ तड़ शब्द पाझरे सरस्वतीच्या
विणेतुन
