ऋतू हिरवा ------
ऋतू हिरवा ------
1 min
392
ऋतू हिरवा ऋतू बरवा
सुगंधित झाली पावसाची हवा
कधी तो ओळखीचा वाटतो
कधी तो अनोळखी वाटतो
कधी धुंद होऊन बेधुंद सुखावतो
कधी रिमझिम होऊन धरेला रिझवतो
कधी अवखळ पोरासम कोसळतो
कधी हट्टी पोरीसम रूसतो
मला पाऊस हवाहवासा वाटतो
नकळत तो मनात दाटतो
यौवनाच्या हिंदोळ्यावर झुलवतो
त्याची माझी प्रीत फुलवतो
