ऋतुबदल
ऋतुबदल
1 min
311
शिशिराच्या चाहुलीने अंग अंग ते गारठले
उबदार स्पर्शासाठी शुष्क काष्ठ ही ते ताठले
होते कधी चैतन्य सळसळणारे जून झाले
पक्षी पाखरांचे गिरक्यांचे क्षण वेचून झाले
निरोप घेऊन फांदीचा पान पिवळे झरले
तरू तळी पडून उपेक्षित आयुष्य सरले
वहाते कधी अलगद वाऱ्याने पाचोळा झाले
जीर्ण रूपांतर नव्या आयुष्याला सामोरे आले
निसर्गचक्र सुरू राहते अव्याहत सृष्टीचे
काय घ्यावा बोध ठरवी पाहणे निज दृष्टीचे
