STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

ऋतु वसंत आला

ऋतु वसंत आला

1 min
527

वृक्ष देती आंम्हा फळे व फुले

हवा सुगंधी नि शीतल छाया |

वसंतऋतू बहरला नाही जर

सृष्टी सारीच जाईल ना लया | |१| |


वसंतऋतूला येऊ देत बहार

गाऊ देत कोकीळ सुंदर गान |

गुलमोहर,पळस फुलता सुंदर

पक्षी,पाखरे ही उडतील छान | |२| |


चराचर सृष्टी येताच बहरुन

फळा फुलांमध्ये येई अत्तर |

वा-यावर मग सुगंध दरवळ

लाजून चूर यौवन ते नवथर | |३| |


घामाने श्रमाच्या भिजता अंग

सुखवून जाई हवेची झुळूक गार |

विसरून जातो सारी विवंचना

नकळतपणे होई श्रमपरिहार | | ४| |


जीर्ण पाचोळा पडतो भूईवर  

होतसे जळण होळीच्या दिवशी |

रंगबिरंगी फुलांचे उधळून रंग

 रंगपंचमी खेळा सृष्टी सांगे जशी | |५| |


Rate this content
Log in