रत्नजडित आभाळ
रत्नजडित आभाळ
1 min
282
असंख्य तारकांच्या गर्दीत
दाट अंधाऱ्या रात्री दिसते,
हिरे-मोती सुंदर चमकती
रत्नजडित आभाळ भासते.
अफाट विश्वातील तारकांचा
संघ लहानसा आकाशगंगा,
विलक्षण विशाल स्वरूप
ग्रहतारे घालती मस्तीत दंगा.
कधी बदलते आपले रंग
चमचम करून लुकलुकती,
आली जर अमावस्या
सगळेच रंग आपले लपवती.
नयनरम्य नजारा रात्रीचा
चंद्र भासे दिमाखात महाराजा,
जड जवाहराने सजले आभाळ
दर्शन घेई पृथ्वीवासी प्रजा.
