STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

रस्ता

रस्ता

1 min
11.7K


आज थांबलय सार

पण काळ थांबला का? 

हाच रस्ता बघा ना 

निर्मनुष्य सुंनसान

यापूर्वी कधी उसंत मिळाली 

होती का याला ?---

अगदी ध्वनिप्रदूषण ,वायुप्रदूषनाने

पार कोलमडला होता तो ...

तरीही अखंड उभा होता 

साथ द्यायला ...

कारण जीवन चक्र थांबवायचे 

नव्हते ना ----- 

कित्येक अपघात बघितले याने 

जीवनाशी स्पर्धा करताना ,मनुष्याला पाहिले त्याने ...

आता त्याच्या सोबतीला आहेत फक्त पादचारी 

तो त्याचं दुःख बघतोय ,तो साक्षी आहे त्यांच्या होत असलेल्या फरफटीचा----

रस्ता आटोकाट प्रयत्न करतो 

त्यांना साथ देण्याचा ---- 

तरीही एखादी मालगाडी 

जाते अंगावरून तेव्हा 

तो काहीच करू शकत नाही --- 

अगदी हतबल होऊन बघत 

असतो हा " रस्ता"


Rate this content
Log in