रस्ता
रस्ता
1 min
728
तोच तोच जुना रस्ता
मला आजही स्मरतो
माझ्या सारखा तो सुद्धा
शेवटी एकाकी उरतो
सल दोघांची सारखी
नाळ म्हणून जुळते
येता आठवण तुझी
मन तेथे रेंगाळते
उभे एकाकी एकटे
झाड वळणा वरचे
कोमजून गेले सारे
घाव समान दोघांचे
आठवण ती स्मरते
बदलतो जरी रस्ता
नकळत मनी उरे
तोच तोच जुना रस्ता
