रॉन्ग नंबर
रॉन्ग नंबर


आज जरा ठरवूनच
रॉन्ग नंबर लावला.....
समजत होत,
दिसतही होत,
माझा एक आकडा चुकला....
तरी सुद्धा मी रॉन्ग नंबर लावला.....
आपलाच आपल्यामध्ये खूप झाला संवाद....
चला म्हंटल करूया थोडा टाइमपास....
आज ठरवूनच हमखास,
करूया चुकीचा व्यक्तीशी
संवाद.....
पण ठरवून ठरवलेला.....
रॉन्ग नंबर राईट निघाला ना राव...
त्याच्याशी बोलल्यावर जाणवलं तोही होता,
रॉन्ग नम्बरच्याच शोधात
जाणवत होते त्यालाही रॉंग नंबर आला आज,
तरीसुद्धा बोलण्याची स्पर्धा जमली खास,,,
विनाकारण अनोळखी व्यक्तीशी गप्पा रंगल्या
खूप वेळ आज,,
जाणून बुजून केलेल्या
चुकीत सुद्धा समाधान आहे मात्र कळले बास,,,
मला वाटते आयुष्यात प्रत्येकाने
एकदातरी ठरवून रॉन्ग नंबर लावून बघावा
आयुष्याच्या वाटेवरती कदाचित उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा,,
प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी थोडा तरी संवाद साधून बघावा,
अवगडलेल्या कोड्याचं
उत्तर मिळाले जणू आज,,
प्रामाणिकपणे जगात सुखी कोणीच नाही,
पण काय हरकत आहे,
रॉन्ग नंबरच्या निमित्याने का होईना थोडंस
सुख ओरबाडण्यात,
बरंच झालं रॉन्ग नंबरचा नावाने आज थोडं हसू आलं ठरवूनच ठरवलं ते
योग्यच झालं आज
योग्यच झालं आज