STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

रणरागिणी

रणरागिणी

1 min
338

जयंती जय हे अंतरगामी

तूच दुर्गा तूच रणरागिणी

सुखदुख झेलूनी संसारात

निर्मियली गजगामीणी..

तुझ्यात गार्गी, मैत्रेयी

दिव्यमणी वंशवाहिनी

तू संवेदनशील जननी

 तूच आई,भार्या भगिनी..

तूच अस्त्र तूच शस्त्र 

लढण्या तत्पर ममतेसाठी

अंगअंगात सामर्थ्य जागवी 

होवून काली महिषासूरमर्दिनी..

थकले ब्रम्ह चैतन्य जेथे

अवतरली जगी आई बाई

खेळ जगाचा या स्त्रीशक्तीवर 

तूच धरेवरची जगजननी...

झांशीची राणी कडेवर लेकरू

गोऱ्यांशी कशी झुंज करारी

चितोडची पद्मिनी,इंदिराबाई

जीवंत प्रतिभा दाखविली दिलेरी..



Rate this content
Log in