ऋण फेडूया भारत मातेचे
ऋण फेडूया भारत मातेचे
देश विविधांगी विविधढंगी
लोकशाहीचा वारसा सन्मानाचा
एकजुटीचा संदेश अवघ्या जगी
संविधान दिधले मान जनाचा
धर्मास तिलांजली विचारांची
प्रत्येकास ध्यास समानतेचा
बदलता भारत दिसे स्वप्नी
मानाचा मुजरा माणुसकीचा
जातिभेदाचा उखडला खोडा
बंधुभावाचा हट्ट असे मनी
माणुसकीचा धर्म खरा मोठा
स्वातंत्र्याचे सर्वच समान धनी
मानापमानाचा विसरुनी घोट
देशसेवेचा उचलावा विडा
वीरजनांचे आठवूनी बलिदान
स्वार्थाने घोटावा वाईटाचा गळा
एकात्मतेचा रंग फडकतो तिरंग्यात
साथ त्यास स्वाभिमान उराउरात
जपणूक मनाची प्रेमाने श्वासात
ऋण फेडूया भारत मातेचे जगतात
