रण मर्द
रण मर्द
शुर विर निष्ठावान,शंभू शिव गाजत |
बलशाली बुध्दीवान,नांव हे शोबत ||
शिव शंभू राजे प्रज्ञावान,हिंदु सम्राट ते |
नावात शौर्यपण ,समरांगण जागते ||
झुंजार वाघ ते,शत्रु नमले तूम्हास...
रण मर्द शिव पुत्र संभाजी राजस...(१)
स्वराज्य शिव पुत्र मांगल्याच प्रतिक |
महाराष्ट्र भुमीचा शिव प्रताप एक ||
स्वराज्य रक्षीता,घाव झेलले अपार |
भारत भुचा किर्तीवान, शिव शंभू बनला आधार ||
अमर ज्वलंत कार्याचा ,लागला हा ध्यास...
रण मर्द शिव पुत्र संभाजी राजस...(२)
रयतेचा राजरत्न राजा जाणता तूम्हीच |
नि:स्वार्थ लढले ना हरले कधीच ||
अफजलास फाडिले शिव नखशिखा वाघ तू |
तलवार बाजींदा विश्र्व प्रताप शुर तू ||
सिंहासन रण मर्दा गर्जतो नभास...
रण मर्द शिव पुत्र संभाजी राजस...(३)
समरांगण,नितीवान,मानस वरदानी |
श्वासा,श्वासात नांव घेता माता जय भवानी ||
सळसळत्या रक्तात,शिव शंभूचे धाडस |
संस्कृतीची दिप माता जिजाईंचे वारस ||
चराचरात जागत राही,शिव छत्रपतींचा इतिहास...
रण मर्द शिव पुत्र संभाजी राजस...(४)
