रंगोत्सव - रंग होळीचे.....
रंगोत्सव - रंग होळीचे.....
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला...
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा ....
रंगत जाऊ रंगात आता
होऊ स्वैर स्वच्छंद
तोडून सारे बंध
आज उधळू आनंद ...
भिजु दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठू दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग...
बेभान मन
बेधुंद आसमंत
भांगेचा संग
सर्वत्र आनंद
सारेच व्हा
होळीच्या रंगात दंग...
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग...
रंगात रंगले जीवन
हर्षात फुलले मन
रंगपंचमीच्या रंगांची रंगली
अशी काही शिंपण
ह्रदयी उरले प्रेम
अन मनात नव्या नात्यांची नवी गुंफण...
रंगपंचमीचे रंग जणु
एकमेकांच्या रंगात रंगतात
असुनही वेगळे रंगांनी
रंग स्वतःचा विसरुनी
एकीचे महत्त्व सांगतात ...
रंगांच्या होळीत रंगुया चला
प्रेमरंग उधळूया चला.....
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्रय, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी ,आरोग्य आणी शांति नांदो.
होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
धन्यवाद....