रंगभूमी आणि जीवन
रंगभूमी आणि जीवन
रंगभूमि आणि हे जीवन!
आहेतच की एक समान!!
रंगभूमि वर नाटक कसे!
तीन टप्प्यात जीवन तसे!!
तेथल्या पात्रांनुसारचआपण!
जगत राहतो सुत्रबद्ध जीवन!!
सुत्रधार चालवेल तितकं चालतो!
सांगेन तेव्हाच जगातनंच हालतो!!
बालपण,तारुण्यअन वृद्धावस्था!
तीनअंकी नाटकाची असे संहिता!!
भुमिकाच करतो ना वेगवेगळ्या!
सा-या नस्तातच जीवनावेगळ्या!!
जीवनातूनंच प्राप्त होती नाट्यविषय!
त्याविण काय त्यात असणार आशय!
पडदा येथे ठरल्या वेळीच पडणार!
जीवन नाट्य त्याप्रमाणेच घडणार!!
कळसुत्री बाहुल्या त्या विधात्याच्या!
असती पात्र जशी हाती निर्मात्यांच्या!!
शेक्सपिअरच्या नाटकांतून पुढे आलेला विचार जीवन एक रंगभूमी व आपण त्या जगनिर्मात्याच्या हातातील कळसुत्री बाहुल्या! तो खरा सूत्रधार. त्यात बालपण, तारुण्य, वृद्धावस्था हे तीन अंकी नाटक. तो सांगेल तशी, तेव्हा भुमिका येथेच टाकून जीवनाच्या पडद्याआड व्हायचे!
