STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

रंगात तुझ्या रंगले मी"

रंगात तुझ्या रंगले मी"

1 min
235

रंगात तुझ्या रंगले मी

ह्रदयाशी नाते जुळले  

रोज ही स्वत:ला रोकूनी 

धूंद जाळ्यात गुंतले...


नको सांगू तू गुपीत आता

तुझ्या खास अंंतरंगातले

मी समजून उमजून घेईन

सख्या भाव खोल तळ्यातले...


स्वप्नात तुला पहावे अन्

गुजगोष्टी करत राहावे 

तुला पाहुन मी अलगद

लाजूनीया मुखास पांघरावे..


गारवा प्रितीचा झनझनीत

 हदयाला स्पर्शूनी गेला 

रंगात रंगूनी तुझ्या श्वासांचे

 सुर सनईचे भासले..

  

माझ्या स्वप्नांचा तू राजा

सुगंधी गुलाबही लाजला

दिलाची ही मस्त धडधड

मद्याविण ही नशा चढला..


Rate this content
Log in