STORYMIRROR

Saroj Gajare

Others

3  

Saroj Gajare

Others

रंगांची उधळण

रंगांची उधळण

1 min
1.1K


रंग तुझ्या भक्तीचा , देहा मना चढला

कीर्तनात रंगला,विठ्ठला तव रंगआगळा ।।१।।


पूर्व दिशेला पहा तरी, तुझ्या रंगांची उधळण

सायंकाळी इंद्रधनूची ती सप्तरंगी गुंफण ।।२।।


आकाशाचा रंग मनोहर जसा शिव नीलकंठ

मावळतीची रंगछटा लोभवी मना आकंठ।।३।।


रंग केशरी न सोनेरी केला धरेला बहाल

टपटप सडा टाकुनी प्राजक्त झाला मुक्त।।४।।


अंगणी सडा सारवण अन रांगोळी रेखाटन

रंगावलीतील विविध रंग असे लोभस दर्शन ।।५।।


पशु पक्षांचे ही मोहक रंग मोहवती मना

मस्यालयातील माशांचे रंग विचारूच नका ।।६।।


शिमग्याच्या धुळवडीचा गुलाल उधळला

रंगात रंगुनी कृष्ण राधेचा रास रंगला ।।७।।


काव्य पुष्प रस चैत्र वसंतात स्रवला

आम्रतरुचा मोहर फुलुनी गंधाळला ।।८।।


निसर्ग-प्राणिमात्रांचे करुनी रक्षण खेळू रंग होळीचा

सृष्टीच्या नवप्रसवाचा अन स्नेह-मांगल्याचा ।।९।।


असा हा होळीचा सण रंगीला रंगात रंगला

राव रंक रंगढंगी रंगारी रंगपंचमीत न्हाला ।।१०।।


Rate this content
Log in