रंगाचे भरती थवे
रंगाचे भरती थवे
1 min
461
नवरंग असे विविध रूपात
अशी नजर हवी बघणाऱ्यात,
पृथ्वीवर सूर्य उधळतो रंग नवे
निसर्गात रंगाचे भरतो थवे,
कुुमूदिनी नव उल्हासाचा संग
निसर्गाच्या अंगाअंगात नवरंग,
नवरंग पाखरू पंख पसारी
आल्हादाची मनी गगन भरारी,
रंग इंद्रधनुचा लावण्यसिंधू
हिरवळ भरे सुप्त दवबिंदू,
जलाशय सागर झरे ओहळे
करी मंथन रंग दावी वेगळे...
