रंग
रंग
1 min
207
अशाच एका सायंकाळी
फुलपाखरे होती जमली
खेळ खेळूनी गेली कोणी
सारी होती तेव्हा दमली
एक पाखरू उडून बैसले
हसत एकट्या फुलावरी
नव्हता गंधही ज्याला काही
रंग ही नव्हता तयावरी
पाखरासवे बोलू लागले
फूल अनामिक ओढीने
जीवापाड जपलेल्या गोष्टी
सांगत बसले गोडीने
हरवून गेले फुलपाखरू
रमले तेही फुलासवे
दोघांच्याही डोळ्यातून मग
दाटून आली का आसवे?
गुंतूनी गेल्या क्षणी फुलाला
मिठीत अलगद घेऊनी
उडूनी गेले फुलपाखरू
आपुला रंग फुलावर ठेवूनी.
