रंग समानतेचा
रंग समानतेचा

1 min

506
रंग ,वर्ण, द्वेष,माजला
मानवतेचं रक्त समान
नाळेत जुळला वाद भेद
पसरली विषमतेची घान
रंग सारे भेदुन गेले
आकाश गर्द दाटले
काळ्या मनाचे मुळे पोसले
संवाद प्रेमाचे मिटले
गुर-गुरणारे बोके झाले
वाघ होऊनी रूसणे फार
समानतेची उलटी मोजणी
कशी चालेलं कलमाची धार
दगडालाही शेंदुर फासला
रंग जातीने मुकला
तुच्छ भावना रूढीत मुरला
माणुस आता गुदमरला
भस्मात सारे रंग फिके
झाले धुंद बेभान
रंगा-रंगात छंद जपावा
रंग हिताचा सर्व समान