STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

रंग मनाचे

रंग मनाचे

1 min
189

रंग मनाचे प्रेमाचे

आई बाबांच्या मायेचे....


रंग मनाचे प्रीतीचे

पतीच्या आगतीक प्रेमाचे....


रंग मनाचे लाडाचे

मुलांच्या भावविश्वात रमण्याचे....


रंग मनाचे द्वेशाचे

मानवी आचरणातील रागाचे...


रंग मनाचे पावित्र्याचे

प्रतीक ते मन मांगल्याचे.......


रंग मनाचे सबुरीचे

सुखदुःखात साथ देण्याचे......


रंग मनाचे मैत्रिचे

हक्काने एकमेका रागवण्याचे....


रंग मनाचे वात्सल्याचे

आजीआजोबांच्या लाडाचे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन