रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
1 min
264
सृष्टीने बगळाच नव्हे
निर्माण केला कावळा
भेदभाव केला नाही
ब्रह्मांड रचिला सगळा
रंगीबेरंगी फुले पाने
भाज्या भेंडी कोहळा
देव सगळ्यात वसतो
असो गाजर, कंद वा मुळा
नित्याचाच क्रम आहे
नव्हे किंचितही आगळा
कुणालाही टळला नाही
जन्म मृत्यूचा सोहळा
लाखात शोभून दिसतो
पांडुरंग माझा सावळा
तसाच शोभतो मला
रंग माझा वेगळा
