STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Others

3  

SAMPADA DESHPANDE

Others

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

1 min
241

(कै. सुरेश भट यांची एका ओळीतून प्रेरणा घेऊन...)


रंगीबेरंगी आयुष्य माझे मी आनंदी अन् हासरी

मी सुंदर रंग होळीचे मी कृष्णाची बासरी

मी साजिरी मी गोजिरी जन्म माझा आगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ||


रंग मातृत्वाचा हृदयी मम् मी आकाशी पक्षिणीसम

लक्ष मम् आकाश जरी दृष्टी माझी पिलांवरी

मी कणखर मी खंबीर जन्म माझा आगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ||


रंग लाल शौर्याचा मी , मी पराक्रमी नी धोरणी

संसार जरी जीवन माझे , मी मुत्सद्दी, राजकारणी

जग बदलायची हिम्मत माझी जन्म माझा आगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ||


कधी शांत सरिता मी , कधी कडाडणारी वीज असे

कधी सुंदर पुष्प मी , कधी गर्जणारी तलवार असे

आदीशक्तीचे रूप मी जन्म माझा आगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन