STORYMIRROR

Angulimaal Urade

Others

3  

Angulimaal Urade

Others

रमा माऊली

रमा माऊली

1 min
409

माझ्या भिमाची सावली

होती माझी रमाई माऊली

भिमरायाला कधी त्रास दिली

शेणी गोवऱ्या थापूनी

संसाराचा गाडा सुरळीत चालवी

जीवनात ती भिमरायाची

होती सदामास सावली


पै पैका बांधूनी गाठी

भीमरावास शिक्षण घेण्यासाठी

लंडन, अमेरिका, इंग्लंडला पाठवी

सदैव ती भीमरायासाठी झीजली

सोना-चांदीसाठी कधी ना रुसली

भीमरावांच्या प्रत्येक सुख-दुःखात

साथ असे ती रमाई माऊली


पोटची चार लेकरं वारली तरी

ना जीवनी ती डगमगली

सावरून जीवन खंबीरतेने

यशवंताचा सांभाळ करूनी

भीमरावास साथ देईल ती माऊली


भिमरायांची स्वप्न पूर्ण होताना बघाया

जीवंत ना ती राहिली

अशी होती भिमाची सावली

"मार्शल" माझी ती रमाई माऊली


साहित्याला गुण द्या
लॉग इन