STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

रक्षणकर्ता...

रक्षणकर्ता...

1 min
252

रक्षण करणारा भाऊच असतो असेही नसते काही.... 

बहिणीची मायाही करत असते रक्षा भाऊप्रेमाची.... 

गर्दीत 'तो' सांभाळून घेतो 'ती'ला.....

आपल्या काळजाच्या तुकड्यासारखा.... 

त्याच्यावर चालून आलेला अपशब्दांचा रणगाडा.... 

'ती' खंबीरपणे रोखणारी आईच्या मायेसारखी..... 

नातं कधी मित्रत्वाचं तर कधी वरचढ मोठेपणाचं....

खट्याळपण दडलेलं या संबंधात....

धाक दाखवणारा नात्यातला जडपणा नसतो कधी.... 

पण दूर होताना आठवणींचं उजाडपण.....  

नातं आणखी करतं घट्ट..... 

दोघा बहीण-भावाचं प्रेम एकमेकांवाचून अपूर्णच....!


Rate this content
Log in