STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
27.4K


आशिर्वाद तुला देते

सुखी परदेशी भला

राखी तुला पाठवीते

रक्षा बंधनाला घाला ।।


ऐक माझ्या भाऊराया

तुला आठवे बहिन

राखी आज पाठविते

ठेवी तू रे माझा मान ।।


कसा सण राखीचा हा

तुझ्याविण हा साजरा

मनी नाही खुशी माझ्या

खुशी मजशी देणारा ।।


साला नंतर येतोया

दिन हा मंगलमय

नको विसरु हे प्रेम

भाऊ हे उत्तुंग सय ।।


नभासम महान हे

आहे अापले रे नाते

कधी होइल सुभेट

माझे झुरते रे मन ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन