STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
89

रक्षाबंधनाचा सण

येते बहिणीची आठवण,

दूरदेशी माझी बहिण

बांधील मज राखी कोण..?


नात्यांमध्ये असे नाते

भाऊ बहिणीचे ते,

आठवण मनोमनी

बहिणीची खूप येते,

कधी येशील ग ताई

नाही आलीस अजून...

    बांधील मज राखी कोण..?


हाती भावाच्या बांधावा

बहिणीने रेशीम धागा,

भावा बहिणींच्या नात्याचा

हेवा वाटावा या जगा,

वाट पाहतो भाऊ तुझा

डोळ्यात आणून प्राण...

   बांधील मज राखी कोण..?


बांधायची बहिणीने

राखी भावाच्या हातात,

जगावेगळं ते प्रेम

भाऊ बहिणीच्या नात्यात,

ताई डोळे भरून येती

येता तुझी ग आठवण...

   बांधील मज राखी कोण...?


मोल बहिणीचे कळे

बहिण नसता जवळ,

भाऊ बहिणीचे नाते

आहे फार जगावेगळं,

खरं भाग्य ते लागते

अशी मिळाय प्रेमळ बहिण..

   बांधील मज राखी कोण...?


Rate this content
Log in