STORYMIRROR

Shamal Kamat

Others

3  

Shamal Kamat

Others

रक्षाबंध

रक्षाबंध

1 min
17

सण आला

बहिणीला

हर्ष झाला


साऱ्या ताई

आतुरल्या

जाण्या घाई

माहेराला


तबकात

चांदीच्या या

पंचारती

हि ठेवू या


बसवू या

पाटावर

चंद्रकोर

माथ्यावर


बहिणीची

वेडी माया

ओवाळते

भाऊराया


भाऊ माझा

दिसे छान

अजूनही

देतो मान


आहे असे

रक्षाबंध

जोडते हे

प्रेमबंध


Rate this content
Log in