STORYMIRROR

गीता केदारे

Others

3  

गीता केदारे

Others

... रखुमाई...

... रखुमाई...

1 min
337


रखुमाई


कसं निजलं कुशीत

कुशीत भयच नाही 

सुरक्षित हीच जागा

भ्रांत कशाचीच नाही ...


आई गाते तू अंगाई

परब्रम्ह तुझी वाणी

फिरे तळहात माथी

स्पर्श भासे रखुमाई....


तुझ्या पुण्याईची थोरवी अगाध 

ऋण तुझे फेडण्या मी असमर्थ 

तुच माझ्या पंखांची ताकत 

बनविशी मज समर्थ.. 


तुजमुळे माझे अस्तित्व 

तूच माझी परमेश्वरी 

जाऊ कशाला मी राऊळी 

तूच वसे मम अंतरी... 


झाला जन्म तुझ्या उदरी

धन्य झालो मी माऊली 

राहो निरंतर कृपादृष्टि 

तुझ्या पुण्याईची सावली... 







Rate this content
Log in