रिमझिम झरणारी बरसात...
रिमझिम झरणारी बरसात...
1 min
144
रिमझिम झरणारी बरसात
शेतकरी दादा सुखावला,
शेतीची सर्व कामे करून
हरिनामात दंग झाला...
रिमझिम झरणारी बरसात
असते शेतीसाठी चांगली,
बहरते जाेमात पीक
पाहून दंग हाेते माऊली...
रिमझिम झरणारी बरसात
हाेते धनधान्य समृद्धी,
अशा पावसामुळे माझी
हाेते सुखासमाधानात वृध्दी...
रिमझिम झरणारी बरसात
माझ्यासाठी या अमृतधारा,
आवश्यक त्या मेहनतीने
फिरकताे सुखाचा वारा....
