रिक्त होताना जीवन
रिक्त होताना जीवन
ओळखीचा सुर का कंपित भासे
भावनेचा पुर ओंजळीत का वाहे
रोजचाच दिवस आज मरणासम भासे
भास नव्हते ते मनीचे शब्द खरे जाहले
आज जाणले गरज नसते कोणाची कोणा
उगाचच फसतात लोक नात्यांच्या वेरूला
जन्म घेणार तो मारणार, जगणार कसं...
इथे कधी कोण नसतं पुसतं तरी का
या जन्माचं त्या जन्माशी नातं गुंफतो
शब्दाचा शब्दाशी भाव बंध जसा जोडतो..
इथे कुठंच नाही माझा गाव असा भास उरतो
खरे कितीही वागा खोट्यास मान्यता इथे
जन्म मृत्यू पेक्षा जगण्यास मान्यता इथे
श्वास आपले तरी का इतरांसाठी जगतो
जगताना तरी ते नि:स्वार्थी / स्वार्थ प्रश्न उरतो
काय पाहिजे जे शब्द फुका मी वाहिले
बोलक्या नजरेत आज प्रश्न उगा न राहिले
अशाच काहीशा होत्या बहरलेल्या बागा फुलांच्या
नजरेत कोरड्या जाहल्या जीवनाला मुकल्या
अशा न अशा का भावते ती मज कोरडी नदी
तहानलेल्या जीवास ही भोवते दु:ख केवढी
सोसवेना मला ही या कळा कुणा जिवाच्या
आज जाणिले होते अनोळखी जाणिवा त्या
होते नव्हते सारे वाहिले मी चरणी तुझ्या
माझे नव्हते ते निखारे परी पदरी सांभाळीले का
नशिबात नव्हे ते फळ कर्मास फुका दोष देतं
नियतीचे लेखी नशीबास कर्माचे गीत गायिले
दिला जन्म विधात्याने लोकांनी नशीब लिहिले
सरळ मार्गी होती एक विमल्ंन्भुजा होती
दैवत्वाची विभूती फास नियतीने आवळला
ओळखी न ज्वालामुखी परी प्रश्नानी घाव केला
मानवाच्या या यातना त्या मानवा न उमगल्या
दुखरे कोरडे आसवांचे झरे भावले ना कुणाला
कधी काळी होती याच बागेची ती एक कळी
फुलली बहरली बाग ती फुले आज कोमेजली
भावनेचा जपला निखारा शब्दांनी तो घात केला
प्रश्न जगण्याचा होता संशयास तोही न खपला
काळजातले बोल आता खरे मुके जाहले
जुन्या त्या वाटेला धूळ पायास लागली
इतकी प्रसंगातुनी मी उभी काळ न्याय करेल ही
प्रश्न आजचा तो भविष्य का ते अंधारला
परी शब्द नव्हते सोबतीला भाव नव्हते साथीला
काळापुढे न्यायमूर्ती ती आंधळी दिसली मला
हाच तो न्याय का विश्वास डोळ्या दखले खोटा
कान ऐकले पुराव्यात सिद्ध जाहले खरे खोटे
चरित्र कोणते दाखले देवू पाहती उगाच
कोणते फसवे तराणे भुलती का हे पाखरे
दुर राहिली बघ आज आपल्या घराची वाट रे...
आजवर जी ही खोटी ओळख ना जपली
खऱ्या संगती आज खोटे ही अंगीकारले
प्रश्न कानी पडतच नव्हता होता तो फक्त राग
अशी कशी काज निखाऱ्यात वास्तव्य जपत गेले
विश्वासाचा बेड्या तिनेच तर आवळल्या
अविश्वासत तिला त्या ही परक्या जाणवल्या
अपेक्षाचं ओझं इतकं का जड झालं..
अचानक सारे पाश हे रिक्त भासू लागले
कळले होते जे पाश कोरड्या नात्यातला गिलवा
पडल्या होत्या त्या भिंती मायेच्या रिक्त भावना
न्याय मागता जगास जगण कठोर वाटेना
परकी होती तरी छळ जगाचा सोसला
न्याय कोणाला मागता नशीबाने घाला केला
शब्द आपुलकीचे चरित्र्यच न्याय बोलतात
अन्यायाची भाषा उगाच दोष जन्मा लावतात
तिच असणं तिचं नसणं काहीच मोजता नसतं
कोडं तुझ्या मनिच नाही मोठ प्रश्न अस्तिवा पडावा
आत्म्यास कलंक लावुनी समज तो ही खोटा ठरला
होतेच आपले सगळे तरी असे परके का वागती
खोटे होते का नाते तरी अवाजवी हक्क का दावती
अमृताचे कण त्यावर विशचे प्रहार जाहला
विशमृत घेता मुखी तरी अंतास कारण ना ठरला
असा तिचा असणं ही नसण्यास कारण ठरल
भाव भावनेचा कुंचला हा रिकामा घट कस,ठरला
आयुष्याची सुर्वात ती शेवटास शीण ठरली
भोग कालचेच तरी भविष्यात का नशीब लिहिती
प्रश्न माझेच मला असे का नेहमी छळती
उत्तरंस ही नसे अधिकार मग निरुत्तर का हे सारेच
नको उत्तर मला न्याय ही नको आता जन्म मरणाच
तो फेरही जाहला फुकाचा असा
नको जगण नको जग तुझ ते
विखुरल्या नात्यात आता नको पुन्हा गुंतणे ते..
जरा जरा मोकळे जीवन आता कुठे रिक्त होते...जीवन...
