रेशमी बंध
रेशमी बंध
बंदिस्त कर रेशीम बंधनात
श्वास ही माझा असाच तू
जग हे भकास ना वाटे पुन्हा
मिळवावा श्वासात श्वास तुझा नव्याने तू...
सुगंध तुझ्या शरिराचा येऊ दे शरीरात नवा
रेशीम बंधाचा भोवती पडावा वेढा
मखमली स्वप्न पुन्हा फुलून येऊ दे
बंधनात अडकले आता शिकून नवा धडा....
तू मी का वेगळे सांग आता तरी
हवी मज रास फुलांची नसे कधी कधी
प्रेमबंधनात तुझ्या राहवे सदा झुलत झुले
जरी पूर्णतः शक्य नसले तरी करु प्रयत्न सदी....
निर्मळ निती उमळती धरती किती
बंध हे रेशमाची जाऊ नये सती
हिच प्रेमात पडता वाटते नित्य भिती
जखम काळजाला अशुध्द वातावरण भोवती....
दगा फटका, चाल टाकती होती बेहाल
रेशीम बंध हे जास्त काट्याचे वाटती
विरह अंतरीचा उगीच पोसत राहती
प्रेमाची पखरण उडयाची राहून जाती....
कालवे सुखात दुःख रेशीम बंध मिळविण्यासाठी
अतिप्रसंग वाट्यास गुलाबाच्या येती
प्रेमळ पणाचे रोपटे जोपासण्याची हवी नियती
सौख्य उमलून यावे प्रत्येक रेशीम भेटी ना कोण भिती...
