STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

रेडिओ व टीव्ही

रेडिओ व टीव्ही

1 min
216

रेडिओच्या जागी

नवा टीव्ही आला

कान आणि डोळे

लागले कामाला


ऐकत करायचो

पूर्वी सारेच काम

गप्पा गाणी गोष्टी

नसे कोठे विराम


खांद्याला अडकवून

शेतात घेऊन जायचो

दुपारच्या वेळी मस्त

खूप गाणे ऐकायचो


जेवतांना ही बसायचा

तो आमच्याच शेजारी

बातम्या ऐकण्यासाठी

यायचे शेजारीपाजारी


कानाने ऐकण्याऐवजी

डोळ्याने पाहणे आले

सर्व कामे झाली ठप्प

बारीक पोरं लठ्ठ झाले


होऊ लागला सर्वांच्या

कामाचा खेळखंडोबा

कधीच कंटाळत नाही

टीव्ही पाहताना बंडोबा


रेडिओ ऐकेना कोणी

पडलंय अडगळीला

टीव्ही असल्याशिवाय

आज शोभा नाही घराला


Rate this content
Log in