STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

रात्र वैऱ्याची असते

रात्र वैऱ्याची असते

1 min
170

अखेर देश स्वातंत्र्य झाले

अनेकांना हक्क मिळाले

जगण्याचे द्वार खुले झाले

पण अजूनही ती स्वतंत्र नाही

मोकळेपणाने फिरू शकत नाही

रात्रीच्या वेळी ......


सर्वच क्षेत्रात तिने बाजी मारली

पुरुषांसोबत काम करू लागली

आरक्षणाचा फायदा ही मिळवली

पण अजूनही तिला कमी लेखले जाते

एकटीला बाहेर जाऊ देत नाहीत

रात्रीच्या वेळी ......


येथे दिवसा फिरणारे सारे मनुष

सायंकाळ होताच हैवान बनतात

दिवसा दिसणारे भोळे चेहरे

रात्र होताच सावज शोधतात

काळजी लागलेली असते तिची

म्हणूनच कोणी तिला जाऊ देत नाही

रात्रीच्या वेळी .......


रात्र हे अंधाराचे प्रतिक आहे

चोर डाकू राक्षसांचा साथी आहे

सर्व काळे कारनामे अंधारात होतात

म्हणून सहसा कोणी फिरकत नाही

रात्रीच्या वेळी .......


Rate this content
Log in