रात्र चांदण्यांची
रात्र चांदण्यांची
1 min
539
रात्र चांदण्यांची बहरून आली
साथ रातकिड्यांची सोबतीस आली.....
नभी चंद्राचे तारांगण फुलले
धरेवर काजवी नेत्रांगण नटले.....
मनमोहक केवडा कसा पसरला
गंध कस्तुरीचा आसमंती दरवळला.....
केशरी प्राजक्त अंगणी विखुरला
रातराणीचा सडा भाळी शिंपला.....
रात्र चांदण्यांची कशी बहरली
लाली बघ तुझ्या गाली आली.....
