STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

राष्ट्रीय प्रतीके

राष्ट्रीय प्रतीके

1 min
241

भारताचा राष्ट्रीय प्राणी

राजबिंडा असे 

वाघ तो मोठा 

रुबाबदार दिसे 


राष्ट्रीय पक्षी मोर

काय वर्णावे सौंदर्य त्याचे 

मनमोहक वाटे डोळ्यांना 

जेव्हा मोर नाचे 


राष्ट्रीय फूल कमल

जरी उमले चिखलात

सुंदर त्याचे रूप

साठून राहते मनात


राष्ट्रीय फळ आंबा

राजा सगळ्या फळांचा 

अमृतासमान चव याची

मान राखा तयाचा 


राष्ट्रीय वृक्ष वड

घेर त्याचा प्रचंड 

जणू देई शिकवण

मन करा रे उदंड 


राष्ट्रीय खेळ हॉकी

शिकवे एकसंधता 

खिलाडी वृत्तीतून सांगे 

आपली महानता


भारताची राष्ट्रीय प्रतीके 

सांगून जातात खूप काही

बोध घ्यावा त्यातून 

वाईट काही नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन