STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

रानफुल

रानफुल

1 min
216

चट्टानाच्या भेगातून

पडलेल्या बिजेतून

अंकुरले मी डौलाने

रोपटे झाले बीजातून..


रोपटे झाले मोठे

रोपट्यास आल्या कळी

कळीतून झाले फुल

तेच मी रान फुल..


माझे रूप झुपकेदार

आकर्षक नारंगी

बहुरंगी छटा शोभीत

भुंगे माझ्या ढंगीत..


फुलपाखरू घिरट्या 

भोवती घालती

माझ्या सौंदर्याने 

रान जीव भाळती..


सर्वांना माझा लळा

सर्वांची दृष्टी माझ्यावरी

भुलविते मी मस्त

असे मी रानफुल..


साहित्याला गुण द्या
लॉग इन