रानफुल
रानफुल


रानफुलांना जरी रंग आणि सुवास
नसला तरी परीचे रूप घेऊन
मधाळ भावना पण जीवंत असतात हो
जरी मी रानफुले असलं
तरी देवाचरणी बहाल व्हायची
माझी पण इच्छा मनात आहे हो
रानफुले बहरत असतील रानात
पण सुंदर भ्रमर आज मधुर गुंज
नक्की कानात सांगेल अशी
आंकाक्षा कुठेतरी लपलेली आहे हो
जरी आम्ही रानफुले बागेची
शोभा वाढ़वत नसलो तरी
इतर फुलांसारखं आम्हाला
पण रानांच्या प्रेमाची गरज भासते हो
ह्या जगात
आईने शिकविलेले शब्द
अखेरपर्यंत आपल्या मनात
कोरून ठेवले असतात
तसेच ह्या रानफुलांचा पण
सजलेल्या माळांचा रानवाटा
सर्वत्र आपल्या सुरेख रूपात
बहरून एक वेगळीच ओळख
निर्मित करतात हे मात्र नक्की हो