राजसा प्रेमाचा
राजसा प्रेमाचा
1 min
208
छेडू नको कान्हा मला
कैसे स्मरू मी रे तुला
रात्री करी खोड्या असा तू
झालास वेडा बावरा
पावा तूझा ऐकून मी
सोडवावे व्यथेतुनी..तू
गुंतले मी जरी आज प्रेमी तुझ्या
धुंद मकरंद ही प्यायली राजसा
येतसे स्वप्न ते श्रीहरी मोहना
सत्वरी धाव रे तू घना दर्शना....
मोहोराने वृक्षच भरला
पाडावर आंबाही आला
कोकीळेची कुहू कुहू कानी
वाट बघते तुमची मैना
वेडावले मानस साजना
राजसा जपते मी माला...
