राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ
1 min
507
स्वराज्य हवे तूला शिवबा
शिकवलेस तु आऊ
राजमाता तू महाराष्र्टाची
तूझे नाव जिजाऊ
घडविलास संस्कार येथे
सन्मानाने जगण्याचा
दिप लाविला अंधारात
घेतला ध्यास स्वराज्याचा
माहेराबरोबरच आपल्या
सासरचे नाव केले
पराक्रमी शहाजी तूझे
कूंकवाचे धनी झाले
राजनिती तूझ्यातली
दिलीस शिवबांना दान
भवानी देवीसमोर
घेतली स्वराज्याची आन
पूरुषालाही लाजवेल असे
जिजाऊ तूझे नेतृृृृत्व
घडविलास इतिहास तू
दिसते शिवबाचे कर्तृृृृत्व
