STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

राजकारणातले रंगकर्मी

राजकारणातले रंगकर्मी

1 min
305

कोणाचं काही होवो मला नाही पडलं

मुख्यमंत्री पदासाठी  माझं घोड अडलं

काकांनी मला खुणावलं देतो तुला खुर्ची

मी सांगेल तसे वाग

राख माझी मर्जी

मीही मग हो म्हणालो हातात मिळवून हात

कमळी बाईच्या पेकाटात मारली मग लाथ

पळून जाऊन दादाने कमळी ताईशी केले लग्न

तीनच दिवसात त्यांचा संसार झाला भग्न 

कोण मराठी कोणतं हिंदुत्व

मला मान्य काकांचे नेतृत्व

मी केला हट्ट काकांनी पुरवला

मुख्यमंत्रि पदाचा घास अलगद भरवला

कमळी बाईच्या घाव बसला वर्मी

हे राज्य आता होईल निधर्मी

कोणाची उतरली धुंदी कोणाला चढली गुर्मी

शेवटी आम्ही सारे राजकारणातले रंगकर्मी 


Rate this content
Log in